'हायवा'च्या धडकेत महिला ठार, औरंगाबाद-फुलंब्री मार्गावर घटना
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : हायवा ट्रकच्या धडकेत स्कुटीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२७) फुलंब्री Phulambri - औरंगाबाद Aurangabad रस्त्यावर सावंगीनजीक असलेल्या निजीवूड सीड्स कंपनीच्या परिसरात घडली. या अपघातात एक महिला जखमी झाली असून या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रीती पाटील (वय ३५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून अन्य जखमी महिलेचे नाव कळू शकले नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले की, स्कुटीवरुन (एमएच २० डीपी ६७३०) दोन महिला औरंगाबादहून फुलंब्रीकडे रविवारी दुपारी जात होत्या. यावेळी स्कुटीला समोरुन येणाऱ्या हायवा ट्रकने (एम.एच २०डीई ७५५०) जोरात धडक दिली. यात स्कुटीवरील सदर महिला हायवाच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात Ghati Hospital दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून प्रीती पाटील यांना मृत घोषित केले. died near phulambri
Comments
Post a Comment