" सांगाती ":-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
" सांगाती "
देवा तू माझा
असता सांगाती
कशाला करु मी
कोणाची गणती....१...
धरूनी बोटाला
मज चालवित
खाचखळग्यांची
मग काय मात ....२....
दुर्लंघ्य डोंगर
करणयासी पार,
तव कृपेचाच
असे रे आधार. ...३....
दुःख संकटांची
नाही मज क्षिती
मार्गदर्शक तू
सखा नि सोबती...४...झ
नित्यानंद बनूनी
राहसि हृदयात
मुक्तानंद होऊनी
करी मज मुक्त....५...
विशुद्ध आनंद
वसो हृदयात
सद्गुरूकृपेची
होवो बरसात....६...
प्रबुद्धानंद सरस्वती
साक्षात हो माता
नतमस्तक ही
होई शिवोदिता....७...
सुनीता सुरेश महाबळ
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा