पुणेकरांसाठी खूषखबर! सोमवारपासून मॉल सुरू होणार





 पुणेकरांसाठी खूषखबर! सोमवारपासून मॉल सुरू होणार


पुणे:-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज काउन्सिल हॉल इथं झालेल्या बैठकीत शहरासह जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी काही निर्णयांची घोषणा केली. त्यानुसार, पुणे शहरातील दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसंच, येथील मॉल देखील सुरू होणार आहेत. अभ्यासिका, वाचनालये सुरू करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. उद्याने आणि मोकळी मैदाने दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू केली जाणार आहेत. सोमवारपासून या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. चित्रपटगृह आणि नाट्यगृहं मात्र तूर्त बंदच राहणार आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंधांमध्ये सध्या कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. करोनाच्या संसर्गाच्या सध्याच्या स्थितीत बदल झाल्यास त्यानुसार निर्बंध कमी-जास्त केले जातील. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून पंढरपूरची आषाढी वारी पायी करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. भाजपनं या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. 'आषाढी पायी वारीला परवानगी नाही. दहा पालख्यांना बसमधून पादुका नेण्यास परवानगी दिली जाणार आहे. प्रत्येक पालखीबरोबर दोन बसेस असतील. एका बसमध्ये ३० वारकरी असतील,' असं अजित पवार यांनी सांगितलं. पायी वारीवरून कोणीही राजकारण करू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025




Comments