रत्नागिरी सीईओंचा पदभार आता डी.पी.ओ. वैभव विधाते यांच्याकडे



 रत्नागिरी सीईओंचा पदभार आता डी.पी.ओ. वैभव विधाते यांच्याकडे


रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांची पदोन्नती वर नाशिक महानगर पालिका उपायुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आजच सोमवारी त्यांनी उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारल्याची माहिती दिली.जुलै २०१९ मध्ये श्री ठोंबरे हे रत्नागिरी नगर परिषद मुख्यधिकारी म्हणून रुजू झाले होते. पुढील जुलै महिन्यात त्यांना रत्नागिरी येथे दोन वर्षे पूर्ण होणार होती. मात्र त्यापूर्वीच पदोन्नतीवर त्यांची नाशिक महानगर पालिका उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. श्री ठोंबरे यांच्याआधी रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी असलेले श्री. अरविंद माळी यांचीही पदोन्नतीवर पंढरपूर पालिकेवर उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा भार आता चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच जिल्ह्याचे डी.पी.ओ. वैभव विधाते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या