एलपीजी गॅसची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने रत्नागिरीत ५ लाखांचा गंडा
एलपीजी गॅसची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने रत्नागिरीत ५ लाखांचा गंडा
▪️ गंडा घालणाऱ्याला औरंगाबाद पोलिसांनी बिहारमधून केली अटक
रत्नागिरी : रत्नागिरीतील एकाला एलपीजी गॅसची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने ५ लाख २० हजार रुपयांचा चुना लावणाऱ्या तरुणाला औरंगाबाद पोलिसांनी बिहारमधून अटक केली. नितीशकुमार जितेंद्रसिंग प्रसाद (वय २६, नवादा बिहार) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात संतोष प्रभाकर बिडू (५५, वायंगणी फाटा) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार ४ एप्रिल २०२० रोजीसंतोष यांनी मोबाईलवर एलपीजीगॅस डिलरशिपसंदर्भात जाहिरातपाहिली होती. डिलरशिपमिळवण्यासंदर्भात त्यांनी आपला भाचा विवेक सुर्वे व वैभव सुर्वे (जयगड) यांच्याशी चर्चा केली. डिलरशीप घेण्याचे नक्की झाल्यानंतर तक्रारदार यांनी भाचा वैभव सर्वे याच्या पत्नीच्या नावाने ऑनलाईन अर्ज केला.८ एप्रिल रोजी आशिष नावाच्या व्यक्तीने तक्रारदार यांना फोन करून तुम्हाला डिलरशीप देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र सुरूवातीला ७ हजार ५०० रूपये आमच्या खात्यामध्ये जमा करावे लागतील, असे आशिष याने सांगितले. डिलरशिप मिळवण्यासाठी तक्रारदार यांच्या मुलाने संबंधित खात्यामध्ये ७ हजार ५०० रूपये जमा केले. यानंतर डिलरशिप सर्टिफिकेसाठी ६४ हजार ९००, एनओसी सर्टिफिकेटसाठी ९६ हजार ४००. गॅस सिलिंडर डिपॉझिटसाठी ३ लाख ५२ हजार रूपये खात्यामध्ये जमा करा, असे आशिष नामक व्यक्तीकडन सांगण्यात आले. दरम्यान वेळावेळी फोनवर झालेल्या संभाषणातून तक्रारदार यांचा विश्वास बसल्याने त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व रक्कम खात्यात जमा केली. डिलरशिपसंबंधी मोबाईलवर पाठवण्यात आलेली कागदपत्रे तक्रारदार यांनी चेंबूर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरिशन लिमिटेड येथे पाठवली. ही कागदपत्रे बोगस असल्याचे कंपनीकडून तक्रारदार यांना कळविण्यात आले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. दरम्यान, चौकशीमध्ये रत्नागिरीतील वायंगणी येथील तरुणाला फसविल्याची कबुली नितीशकुमारने पोलिसांजवळ दिली आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment