वंशाची पणती:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
वंशाची पणती
वंशाची पणती सुरेख लेक
सोनपरी असे माझ्यासाठी
सुरेख साजिरी गोड गोजिरी
ना मागणी केली लेकासाठी...
मागते देवा एकच मागणी
पाठव ना मज आता एक परी
वंशाची माझ्या पणती बनवूनी
घडविन मी तिला लढाऊ नारी....
वाढवेल माझा मान पान
मोठं मोठ्यांमध्ये अभिमान
करेल ती चळवळीची कार्य
ठेऊन समता समानतेचे भान...
उदरी येई दे सोनपरी
वसा घेऊनिया सावित्रीचा
सोज्ज्वळ मुर्ती सुरेख छान
उद्धार करेल स्त्री जन्माचा....
वंशाची असेल माझी पणती
पेटवून दिवा एक ज्ञानाचा
पेटून उठतील अनेक पणती
नाश करे दृष्ट, वाईट प्रथेचा....
वंशांच्या पणातीचा राखू मान
दोन्ही घराणे सांभाळते प्रेमाने
वंशाची वेल तिच्या मुळे चालत
आदर करा स्त्रीचा मोठ्या मनाने..
फ्रेश न्यूज साहित्य सहवास

Comments
Post a Comment