पुणेकरांसाठी चांगली बातमी! शहरातील करोना रुग्णांची संख्या घटली



 पुणेकरांसाठी चांगली बातमी! शहरातील करोना रुग्णांची संख्या घटली


 पुणे:-सक्रिय रुग्णांच्या संख्येत आता सातत्याने घट होत असल्याने पुणेकरांना दिलासा मिळत आहे. शहरात सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजारापर्यंत खाली आली असून जिल्ह्यात ही संख्या दहा हजाराच्या आत आली आहे. रुग्णसंख्या घटत असली, तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे तसेच गर्दी न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.पुणे शहरात सक्रिय रुग्ण २५५९, पिंपरीत ११७६; तसेच ग्रामीण भागात सहा हजारापर्यंत सक्रिय रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ९७३६ सक्रिय रुग्ण आढळल्याने ही संख्या आता घटली आहे. पुण्यात २११, पिंपरीत २२०; तसेच ग्रामीण भागात ७७४ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकूण १२०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरात ३०२ तर पिंपरीत २३५ रुग्ण करोनामुक्त आढळले आहेत. ग्रामीण भागात १०६८ रुग्ण; तर एकूण जिल्ह्यात १६०५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दहा लाख ११ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.गेल्या चोवीस तासांत पुण्यात आठ, पिंपरीत चार; तर ग्रामीण भागात सहा अशा १८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागलेआहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार ५६० जणांचे प्राण गेले आहेत.


पुण्यातील शनिवारची स्थिती:-

नवीन रुग्ण : २११
बरे झालेले रुग्ण : ३०२
दिवसभरात मृत्यू : ८
पिंपरी चिंचवडची स्थिती
नवीन रुग्ण : २२०
बरे झालेले रुग्ण : २३५


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments