बीडमध्ये आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा, सुरेश धस करणार नेतृत्व

बीड : मराठा समाजाला Maratha Community पूर्ववत आरक्षण मिळावे. यासाठी भाजप आमदार सुरेश धस MLA Suresh Dhas यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २८) शहरात मोर्चा निघणार आहे. त्यांच्या जिल्हाभर झालेल्या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मोर्चा मोठा होईल, असा अंदाज बांधला जात आहे. मराठा समाजाचे आरक्षण Maratha Reservation सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court Of India रद्द केल्यानंतर समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप BJP पक्ष म्हणून जिल्ह्यात काही ठोस कृती कार्यक्रम झाला नाही. राज्यातला आणि जिल्ह्याला पहिले आंदोलन बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा नावाने झाले. पण, त्याचे नेतृत्व शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केले. त्यामुळे याचा भाजपशी थेट संबंध नव्हता. दुसरीकडे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपने राज्यभर आंदोलन पुकारले. मराठा आरक्षण रद्द झाल्याचा थेट परिणाम पिढ्यांवर होणार असताना भाजपकडून जिल्ह्यात ठोस काहीच नाही. परंतु ओबीसी आरक्षणासाठी Obc Reservation तालुकानिहाय आंदोलने पुकारल्याने मराठा समाजातून विविध प्रतिक्रिया उमटायला सुरु झाल्या. त्यामुळे यात भाजप आमदार धस यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पत्रकार परिषदेत भाजपचा मराठा आरक्षणासाठी मोर्चा अशी घोषणा केली. परंतु, त्यांनी मोर्चासाठी घेतलेला पुढाकार आणि तयारी बहुधा भाजप नेतृत्वाला पचल्याचे दिसत नाही. त्यामुळे धसांनी याची एकाहाती धुरा खांद्यावर घेत जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरु केले.today morcha held for maratha reservation in beed

अगदी इतर पक्षीयांनाही त्यांनी सहभागासाठी साद घातली आहे. बीड Beed शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी धसांच्या मोर्चासाठी बैठकाही घेतल्या. त्यामुळे मोर्चा जोरदार निघेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments