बेदम मारहाण करून एकाचा जालन्यात खून, शेतीचा वाद विकोपाला
जालना : शेतीच्या वादातून जालना-अंबड Ambad रस्त्यावरील लक्ष्मीकांतनगर येथील एका हॉटेलमध्ये सहा जणांनी बेदम मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना रविवारी (ता.२७) सायंकाळी घडली आहे. दीपक देवचंद सले (वय ४५, रा.नूतन वसाहत, जालना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृताचा मुलगा कृष्णा सले याच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी दिली आहे. जालना Jalna तालुक्यातील कुंबेफळ शिवारात दीपक सले याचे शेत आहे. रविवारी दुपारी दीपक सले व त्यांचा मुलगा कृष्णा सले असे दोघे शेतात Agriculture गेले होते. यावेळी मंगलबाई सले, तिचा भाऊ रामसिंग तिलवारवाले यांनी शेतीच्या हिश्श्यावरून त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर दीपक सले व कृष्णा सले हे लक्ष्मीकांतनगर येथील हॉटेल येथे आले. त्यानंतर सायंकाळी संशयित मंगलबाई सले, तिचा भाऊ रामसिंग तिलवारवाले, शिवसिंग तिलवारवाले, दिनेश तिलवारवाले (सर्व रा.ढवळेश्वर) तसेच इतर दोन जणांनी दीपक सले यांना लोखंडी रॉड मारहाण केली. काठ्याने डोक्यात, चेहऱ्यावर, खांद्यावर वार केले.
यात दीपक सले यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका जालना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेळके यांनी दिली.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Comments
Post a Comment