असल्या अर्धवट लॉकडाऊन ला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध; निखिल देसाई; तालुकाध्यक्ष, रत्नागिरी व्यापारी महासंघ
असल्या अर्धवट लॉकडाऊन ला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध; निखिल देसाई; तालुकाध्यक्ष, रत्नागिरी व्यापारी महासंघ
◼️ 24 तासात निर्णय बदला अन्यथा दुकाने आणि हॉटेल्स सुरू करणार
रत्नागिरी : आजपर्यंत 2 महिने व्यापाऱ्यांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केले आहे. आजपर्यंत केवळ कागदावर असलेला लॉकडाऊन आता व्यापारी सहन करणार नाहीत. लॉकडाऊन ची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक आहे. रेल्वे वाहतूक, औद्योगिक वसाहत(MIDC), एस. टी. वाहतूक, खासगी कार्यालये, बँका इत्यादी सुद्धा बंद ठेवावे. केवळ दुकाने बंद ठेऊन कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येत नाही हे आजपर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केवळ दुकाने बंद ठेवणे चुकीचे आहे. आतापर्यंत दोन महिने दुकाने जवळपास बंदच होती. तरीदेखील रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. अश्या अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. रुग्ण व हॉस्पिटल ह्यांचा विचार करता दूध व भाजीपाला विक्रीचे नियोजन मागीलवर्षीप्रमाणे प्रशासनाने करणे गरजेचे आहे. त्याला होम डिलिव्हरी हा पर्याय योग्य नाही. असल्या अर्धवट लॉकडाऊन ला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध आहे. आजचे प्रशासनाचे आदेश रद्द करून रुग्णांचा विचार करून दूध, भाजीपाला व मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना, बँका, खासगी कार्यालये, रेल्वे व एस. टी. वाहतूक, औद्योगिक वसाहत (MIDC) हे सर्व बंद करण्याचे आदेश प्रशासनाने 24 तासात काढावे अन्यथा 2 जूनपासून सर्व व्यापारी आपली दुकाने व हॉटेल्स सुरू करतील. त्यानंतर प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोणताही अडथळा आणू नये, असा इशारा रत्नागिरी व्यापारी महासंघचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई यांनी दिला आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment