व्यापाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाया सलोख्याचे वातावरण बिघडवत आहेत : दीपक पटवर्धन




 व्यापाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाया सलोख्याचे वातावरण बिघडवत आहेत : दीपक पटवर्धन


 रत्नागिरी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून व्यापार बंद ठेवण्यात आलाय. सर्वांनी व्यापक हित लक्षात घेऊन या धोरणाला आजवर सहकार्य देखील केलंय. मात्र आता व्यापार बंद असल्याने अंगावर पडणारा खर्च दीर्घकाळ पेलणे अशक्य बनले आहे. आर्थिक विवंचनेतून अस्थापना उघडल्या असता कायद्याच्या कर्तव्यातून पोलीस यंत्रणा व्यवसायीकांवर कारवाई करते. या सर्वांमुळे सलोख्याचे वातावरण बिघडत आहे व नाराजी वाढत आहे. या कठीण काळात जनमानसाची स्थिती समजून घेऊन मार्ग काढण्याची कसरत प्रशासनाला करावी लागेल असा सल्ला बीजेपीचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. मागील काही दिवसांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असून याबाबत व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. व्यापाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी बीजेपी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते असे म्हणतात कि लग्नविधी करायला परवानगी आहे मात्र दागिने खरेदीला नाही. जुने कपडे घालून लग्नविधी कसे होणार ? फोटोग्राफर, मोबाईल आदि अनेक अस्थापना ज्या एकमेकांवर परस्परपूरक आहेत त्या बंद आहेत. ठराविक अस्थापना सुरु व ठराविक बंद ठेऊन कोरोनावर प्रतिबंध कसा येणार असा प्रश्न या पत्राद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. तरी एकंदर परिस्थिती लक्षात घेत सबुरीचे धोरण अवलंबवावे व निर्बंध पाळत कशी सवलत देता येईल हे पहावे अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.


.....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments