नाशिकमध्ये पावसाची दडी, शेती कामांना ब्रेक, जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट














 नाशिक : जून महिना संपत आला तरी नाशिक जिल्ह्याकडे (Nashik Rain Update) पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसाने दिलेल्या दडी नंतर शेतीच्या कामांना ही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमध्ये फक्त 27 % पाणीसाठा शिल्लक राहिलाय त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फक्त 38% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने अधिक चिंता वाढलीय. गंगापूर,पालखेड,दारणा,ओझरखेड,भावली,या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यास भीषण पाणी टंचाई ओढवण्याची शक्यता आहे. (Nashik Rain Update due to low rain farm works stopped and Nashik people faces water crisis)

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकंट

नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेय. रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसावर ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्यात. मात्र, मृग नक्षत्रात अद्यापही पाऊस झालेला नाहीये आठवडाभरात पाऊस झाला नाही . नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पेरणी संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात खरिपाच्या 3.22 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. परंतु, आता पाऊस लांबल्याने या पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरेशा पावसानंतर पेरणी करावी, दादा भुसेंचं आवाहन

महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुरेसा पाऊस होत नाही तो पर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पेरणीचा मोठा अनुभव आहे. व्यवस्थित पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असं ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारचं धोरण शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असंच आहे,असं देखील ते म्हणाले. ते शेतकरी कार्यशाळेत बोलत होते.

राज्यात 22 जूनपर्यंत 27 टक्के पेरण्या

राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जून पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments