देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या खेळाडूचे निधन; करोनावर मात केली पण...

 


देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या खेळाडूचे निधन; करोनावर मात केली पण...


नवी दिल्ली: बॅकॉक येथे झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारे भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. डिंको सिंह गेल्या काही काळापासून आजारी होते. २०१७ पासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.गेल्या वर्षी डिंको यांना करोनाची लागण झाली होती. पण ४१ वर्षीय डिंको यांनी करोना व्हायरसवर मात केली. २०२० मध्ये डिंको यांना दिल्लीच्या इस्टीट्यूट ऑफ लिव्हर अॅड बिलियरी सायन्स (ILBS) मध्ये रेडिएशन थेरेपी देण्यात आली होती. त्यानंतर ते त्याच्या निवासस्थानी इन्फाळ येथे गेले होते.डिंको सिंह यांना १९९८ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१३ साली पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला होता. केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजीजू यांच्यासह अनेक खेळाडूंनी डिंको यांना श्रद्धांजली दिली आहे.दिग्गज बॉक्सर मेरी कोमने देखील डिंको यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तुम्ही देशाचे खरे हिरो होता. तुम्ही आमच्यातून निघून गेला आहात. पण तुमी दिलेल्या आठवणी आमच्या सोबत असतील.रिजीजू म्हणाले, डिंको सिंह यांच्या निधनाने मी दु:खी झालो आहे. ते भारताचे सर्वोत्तम बॉक्सर होते. १९९८ साली सुवर्णपदक जिंकून त्यांनी देशात बॉक्सिंग क्रांतीला जन्म दिला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments