अभिमानास्पद! अमरावतीच्या पोलीस शिपायाला विदेशात सेवा बजावण्याची संधी

 




                अमरावती पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेले विकास अंजिकर यांना विदेशात सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे. 


हायलाइट्स:

  • अमरावती पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा
  • ग्रामीण पोलीस दलातील शिपायाला विदेशात प्रतिनियुक्ती
  • पोलीस शिपाई विकास अंजिकर यांची निवड. 

  • अमरावती: महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलीस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवण्यात आल्याची घटना तशी विरळच. अमरावती ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर यांना ही संधी मिळाली आहे. त्यांची विदेशात प्रतिनियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे.

    'आयएएस, आयएफएस' दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी विदेशात पाठवले जाते. मात्र, अशाच प्रकारे सेवा देण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई विकास अंजिकर यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी दिली आहे. अधिकार्‍यांप्रमाणेच पोलीस दलातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना विदेशात सेवा देण्यासाठी पाठविण्यात येते. याच योजनेअंतर्गत विकास अंजीकर यांना तीन वर्षांसाठी 'फॉरेन डेप्युटेशन'वर पाठविण्यात आले आहे. 

      ....................................
      २ लाख हून अधिक वाचक
      ५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
      ऑनलाईन व प्रिंट मीडिया
      .......................................
      सत्यमेव जयते ! 
      24x7 
      www.freshnewz.in
      freshnewsindia24@gmail.com
      fresh@freshnewz.in
      .......................................
      भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
       RNI- MAHMAR/2011/39536
      .......................................
      फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
      बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments