रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंट संक्रमित रुग्णाचा मृत्यू

 



रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंट संक्रमित रुग्णाचा मृत्यू


रत्नागिरी: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे, ही दिलाशाची बाब असली तरीही आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित 21 रुग्ण आहेत. यापैकी या नव्या व्हेरियंटने संक्रमित रत्नागिरी जिल्ह्यातील 80 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. या रुग्णाला इतरही अनेक सहव्याधी होत्या, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. संगमेश्वरमधील 80 वर्षाच्या महिलेचा या नव्या स्ट्रेनने मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला. याला आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दुजोरा दिला. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतर आजारही होते.टोपे यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2 तर पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक 1 डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांनी लस घेतली होती का? तसेच त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments