प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी अंतर्गत कोविड १९ टेस्टिंग साठी ग्रुप ग्रामपंचायत बॉंडये नारशिंगे येथे ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद.....

 



प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी अंतर्गत कोविड १९ टेस्टिंग साठी ग्रुप ग्रामपंचायत बॉंडये नारशिंगे येथे ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद.....


सध्या जिल्हात कोविड १९ या आजाराची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे . सदर आजाराला आळा घालणेसाठी प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णाचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग आवश्यक आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांची कोविड टेस्ट करणे अत्यावश्यक आहे. तेच धोरण घेऊन आरोग्य खात्यामार्फत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोविड १९ टेस्टिंग साठी ग्रुप ग्रामपंचायत बॉंडये नारशिंगे येथील ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी उपस्थित मान्यवर सरपंच सौ. सुहानी कुळये, उपसरपंच श्री. महेशजी देसाई, छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनिल धावडे, ग्रामसेवक सोनकांबळे, डेटा ऑपरेटर श्री. समीर गोताड,पोलीस पाटील श्री. प्रविण कांबळे, बोन्डे पोलीस पाटील सौ. विशाखा पानगले, विना पानगले, अंजली आग्रे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी चे कर्मचारी,आशा इंदुलकर मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. सुप्रिया कांबळे व ग्रामस्थ श्री. युवराज कांबळे, प्रविण रोडे, वसंत कांबळे, गणपत कांबळे, अर्जुन कांबळे, श्रीपत गोताड, पांडुरंग कांबळे, अमोल कांबळे उपस्थित होते.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments