'या' तारखेपासून पालिकेच्या शाळा होणार सुरू, ऑफलाईन की ऑनलाईनचा निर्णय परिस्थितीनुसार घेणार
'या' तारखेपासून पालिकेच्या शाळा होणार सुरू, ऑफलाईन की ऑनलाईनचा निर्णय परिस्थितीनुसार घेणार
अमरावती : कोरोनाच्या जीवघेण्या धोक्यामुळे राज्यात सर्वत्र शाळा बंद होत्या. पण आता कोरोनाचा धोका कमी होत असल्यामुळे सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. यंदा शाळाही सुरू करण्यात येत आहे. अमरावती महानगर पालिकांच्या शाळांचे सन २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष येत्या २८ जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू करायच्या की ऑनलाइन, याबाबतचा निर्णय मात्र त्यावेळेसची परिस्थिती पाहून घेतल्या जाईल, अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. अब्दूल राजीक यांनी दिली.राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयाने सर्वच शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या नावाने १४ जून रोजीच पत्र जारी केले आहे. २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. इयत्ता १ ते ९ वी व इयत्ता ११ वीच्या ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.दरम्यान, इयत्ता १० व १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून, मर्यादित वेळेत सदर निकाल घोषित करावयाचा असल्याने या वर्गातील शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे कोरोनामुळे पुढील सुचनेपर्यंत शाळा बंद असल्या, तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन (एससीईआरटी)च्या सूचनांप्रमाणे ऑनलाइन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.नव्या शैक्षणिक सत्राची तारीख निश्चित झाल्याने आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्याचीही जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. महापालिका, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक घरोघरी फिरून तेथील पाल्यांना सरकारी शाळांमध्ये टाकण्याचे आवाहन पालकांना करीत आहे; मात्र कोरोनाच्या स्थितीमुळे या विद्यार्थी शोधमोहिमेत बऱ्याच अडचणी येत असल्याचे गंभीर चित्र आहे.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment