महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार; सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक दोन वर्षापासून प्रतीक्षेत
महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार; सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक दोन वर्षापासून प्रतीक्षेत
देवरुख :-संगमेश्वर तालुक्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. तालुक्यात गेली दोन वर्षांपासून सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक अर्ज करत आहेत. मात्र महावितरण कंपनीकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहेत. एरव्ही विजवसुलीबाबत सतर्क असणारी महावितरण कंपनी सदोष मीटर बदलण्याबाबत मात्र चालढकल करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे ग्राहकांना मात्र नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.महावितरण कंपनीकडून लॉकडाऊन काळातही विजग्राहकाना आवाजवि बिल आकारून पिळवणूक केल्यानंतर महाराष्ट्र् नवनिर्माण सेना, भाजप अशा विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला. मात्र यावर कम्पनी सह ऊर्जामंत्री व शासनाने घुमजाव करत विजग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली .यामुळे विजवितरण कम्पनी बाबत विजग्राहकामध्ये संतापाची लाट पसरली.वसुलीबाबत कम्पनी कडून आडमुठ्या धोरणाचा अवलंब करत वसुली मोहीम राबविली गेली व तत्परता दाखवली गेली. विजग्राहकाना सेवा देताना मात्र कम्पनी नेहमीच हात आखडता घेत असल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी विजवाहिन्या भोवती झाडे वेली यांचे साम्राज्य पसरले असल्याचे पहायला मिळते. तर काही ठिकाणी विधुत खांब पूर्णपणे धोकादायक अवस्थेत असल्याचे दिसून येते. तर अनेक वर्षे जुन्या विजवाहिन्या जनतेच्या जीवाशी खेळ खेळतानाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment