पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

 


पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या


साडवली : संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये लावगणवाडीतील प्रौढाने पत्नीच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. या प्रौढाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीसह पाच जणांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश पांडुरंग भुवड (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. यावेळी पंचनामा करत असताना पोलिसांना प्रकाश भुवड यांनी आत्महत्येपूर्वी लिहन ठेवलेली चिठ्ठी सापडली. यामध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून व तिच्या वाईट वागण्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. शेजारी राहणारा सुरेश भुवड व त्याचा मुलगा आदि याने आपली वडिलोपार्जित जमीन बळकावली असून आपल्या मृत्यूस तेही कारणीभूत असल्याचे चिठ्ठीत प्रकाश भुवड यांनी लिहिले आहे. यानुसार संगमेश्वर पोलिसांनी प्रकाश भुवड यांची पत्नी प्रतिभा भुवड, सुरेश भुवड, सुभाष शितप, सुनंदा बाचिम आणि आदि भुवड या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो. नि.उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिस करीत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या