संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणारा अटकेत





 संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणारा अटकेत


संजय घोडावत (sanjay Ghodawat)यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी (intimidates) मागणाऱ्या एकाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. रमेशकुमार प्रजापती ठक्कर असे त्याचे नाव आहे.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील लॉजवर ही कारवाई करण्यात आली. रमेशकुमार याच्याकडून एक लाख रुपये रोख व पंधरा हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार व्ही. पी. सिंग अद्याप बेपत्ता आहे.उद्योगपती संजय घोडावत यांना मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून धमकीचे फोन येत होते. त्यांचे व्यावसायिक भागीदार नीलेश बागी यांनाही फोन करून धमकावण्यात (intimidates) आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कुटुंबाचे बरेवाईट होईल, असे सांगितले होते.याबाबतची फिर्याद घोडावत यांनी पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी तपास करून रमेशकुमार याच्याशी संपर्क केला. मुंबईमधील सीएसटीजवळ एका लॉजमध्ये पैसे घेऊन येण्यास त्याने सांगितले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी रमेशकुमार याला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या