रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल मधील गैर व्यवस्थेबद्दल श्रीराम शेंडे यांचे गंभीर आरोपाचे निवेदन
रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल मधील गैर व्यवस्थेबद्दल श्रीराम शेंडे यांचे गंभीर आरोपाचे निवेदन
मी श्रीराम चिंतामणी शेंडये माझे नम्र निवेदन पुढील प्रमाणे आहे. दिनांक 19-4-21 माझी पत्नी सौ. वैदही श्रीराम शेंडये आजारी झाली म्हणून मालगुंडला खाजगी डॉक्टर कडे घेऊन गेलो तेव्हा समजले की तिची ऑक्सिजन level 74 वर आली होती, लगेच मी 108 नंबर वर फोन करून गाडी मागवली, आल्यावर गाडीमध्ये तिला ऑक्सिजन लावला. मग ऑक्सिजन level 95 वर आली.या गाडीने आम्ही रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलला आलो. तिथून महिला covid हॉस्पिटल मध्ये जायला सांगितले. महिला covid हॉस्पिटल मध्ये अनागोंदी कारभार आहे. तेथे ऍडमिट केल्यापासून संध्याकाळ पर्यंत एकही डॉक्टर आमच्या पेशंट जवळ फिरकला नाही.पंधरा-वीस पेशंटच्या हॉलमध्ये एकच संडास बाथरूम आहे. येथून आम्ही दिनांक 20-4-2021 रोजी डॉक्टर पाटील यांच्याशी संपर्क करून आम्ही सिविल मुख्य हॉस्पिटल ला गेलो. महिला covid हॉस्पिटल मधून ऑक्सिजनची व्यान आम्हाला उपलब्ध करून दिली नाही म्हणून पेड ऑक्सिजन van करून सिविल मुख्य हॉस्पिटल ला आलो. महिला covid हॉस्पिटल मध्ये आमचा स्वतःच्या मालकीचा ऑक्सी मिटर काढून घेतला.सिविल मुख्य हॉस्पिटल ला आल्यानंतर माझी मुलगी मुग्धा आईला घेऊन I.C.U मध्ये गेली. मला तोपर्यंत बाहेरच थांबावे लागले. मग मी हळूहळू हॉस्पिटल मध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मला एवढा अशक्तपणा आला की मला एक पाऊल पुढे टाकता येईना. मी तिथेच बसलो मला कोणी उचलून नेले मला काहीच माहिती पडले नाही. मलापण तपासणी नंतर covid ची लागण झाल्याचे कळले. त्यावेळी मला श्री वैभव सरदेसाई व सौ. स्वरुपा सरदेसाई यांची खूप मदत झाली.माझा मोबाईल सिविल हॉस्पिटल जनरल वार्ड रूम नंबर. 7 चोरीला गेला त्यामुळे मला कोणाकडे संपर्क साधता आला नाही.सिविल मुख्य हॉस्पिटल ला मला चांगली ट्रीटमेंट मिळाली व मी पूर्ण बरा झालो. परंतु माझ्या रिपोर्ट ची फाईल मला आज पर्यंत मिळाली नाही. मला ट्रीटमेंट चांगली मिळाली म्हणून मी खूष होतो. माझ्या पत्नीला सौ. वैदही ला ही चांगली ट्रीटमेंट मिळेल अशी आशा होती.परंतु तिला दिनांक 20-4-2021 ते दिनांक 29-4-2021 दुपारपर्यंत I.C.U मध्ये ट्रीटमेंट चांगली मिळत होती. पण दिनांक 29-4-2021 ला मला किंवा माझ्या मुलीला पूर्व कल्पना न देता परस्पर वैदही ला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले. दिनांक 29-4-2021 ला तिची ऑक्सिजन लेवेल 82 होती. त्याच रात्री रात्रभर तिला आतोनात त्रास झाला. ताप आला दिनांक 30-4-2021 देहावसान झाले.या निवेदनाचे कारण असे की त्यांनी आम्हाला I.C.U मधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याची पूर्व कल्पना दिली असती तर आम्ही दुसऱ्या I.C.U ची उपलब्धी बघून तिला तिथे शिफ्ट केले असते.तिला I.C.U मधून जनरल वॉर्डमध्ये स्विफ्ट करण्यास ज्यांचा ज्यांचा हात असेल त्यांना गणपतीच्या कृपेने त्यांची शिक्षा या जन्मात भोगावी लागेल. माझी पत्नी गेली याचे अपार दुःख कधीच भरून निघणार नाही.या निवेदनाची योग्य ती चौकशी सक्षम अधिकाऱ्यां मार्फत व्हावी. यापुढची घटना सिविल हॉस्पिटल मधून दिनांक 24-5-2021 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान श्री बोरकर नामक व्यक्तीने फोन करून विचारले सौ वैदही शेंडये कुठे गेल्यात त्यांना डिस्चार्ज मिळाला का असा आपला सिविल मुख्य हॉस्पिटल चा अजब कारभार आहे.माझी पत्नी तर परत येणारच नाही परंतु पुढच्या लोकांनी सावध व्हावे म्हणून मी हे निवेदन लिहिले आहे. परंतु हे निवेदन कचऱ्याच्या टोपलीत जाईल याची मला कल्पना आहे.
तरी ही चौकशी योग्य त्या अधिकाऱ्या मार्फत व्हावी.
याची एक-एक प्रत.
माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी
माननीय उदय सामंत
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी
व माननीय राष्ट्रपती.
यांना पाठवलेले आहे. अजून झालेल्या प्रसंगातून आम्ही सावरलेलो नाही. म्हणून निवेदन उशिरा लिहिलेले आहे.
श्रीराम शेंडये
गणपतीपुळे.
9421233910. गणपतीपुळे वार्ताहार
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment