धावपटू मिल्खासिंग यांचे निधन
धावपटू मिल्खासिंग यांचे निधन
देशातील सर्वोत्तम धावपटू आणि भारताचे नाव जगभर पोहोचवणारे मिल्खासिंग यांचे काल रात्री ११:३० वाजता निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोना मधून ते बाहेर पडले होते, पण काल रात्री शुक्रवारी मिल्खा सिंग यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. याच आठवड्यात मिल्खासिंग यांची पत्नी निर्मल मिल्खासिंग यांचे निधन झाले होते. मिल्खासिंग यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला तर निर्मल मिल्खा सिंग यांचे वय ८५ होते.काही दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन डॉक्टरांनी घरी देखील पाठवले होते पण अचानक काल त्यांची तब्येत बिघडल्यामुळे पंजाब मधील पीजीआय दवाखान्यांमध्ये त्यांना दाखल केले गेले पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.फ्लाइंग सिख या नावाने मिल्खा सिंग ओळखले जायचे याच आठवड्यामध्ये त्यांची पत्नी निर्मल मिल्खासिंग या कोरोनामुळे निधन पावल्या होत्या आणि त्यावेळेस मिल्खा सिंग हे दवाखान्यामध्ये आयसीयूमध्ये ऍडमिट होते व त्याच कारणाने त्यांच्या पत्नीच्या अंत्यविधीला देखील ते उपस्थित राहू शकले नव्हते.भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही याबाबत दुःख व्यक्त केले आहे ते म्हणाले, भारताने आज एक महान खेळाडू हरवला आहे. मिल्खासिंग यांच्या जीवनावर फरहान अख्तर यांनी भाग मिल्खा भाग हा चित्रपट देखील बनवला होता. फरहान अख्तर यांना मिल्खासिंग यांच्या निधना बाबत कळल्यावर त्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
.....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment