पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तपशील

 




 पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तपशील


रत्नागिरी : जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 16 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. दापोली तालुक्यात मौजे कॅम्प्‍ येथील अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी विजेच्या धक्यामुळे विद्युत उपकरण जळून खाक झाले असून अंशत: 5 लाख 91 हजार 130 रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे माटवण येथे सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एकबाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: 4 हजार रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे बांगतीवरे येथे गोविंद लक्ष्मण शिंदे यांच्या घराचे पाऊसामुळे अशंत: 16 हजार 50 रुपयांचे नुकसान झाले. मौजे कळबट येथे शेवंती नारायण महबहे यांच्या घराचे पाऊसामुळे  अंशत: 65 हजार  650 रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. चिपळूण तालुक्यातील मौजे चिपळूण विभागातील वनोशी-पन्हाळ दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद. सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु, कोणतीही जिवीत हानी नाही. खेड-दापोली राज्य मार्गावर दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद. सदर ठिकाणी सां.बा.विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु, कोणतीही जिवीत हानी नाही. राजापूर तालुक्यात मौजे हातिवले येथे संजय शिंदे यांच्या घराचे पाऊसामुळे घराची सरंक्षक भिंत कोसळल्याने अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कोंडवाडी येथे अनंत राहटे यांचया गोठयाचे पाऊसामुळे अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कोळवण येथे निता शिवाजी मोरे यांच्या घराचे पाऊसामुळे अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे चौके येथे प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराचे पाऊसामुळे अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कुंभवडे येथे जि.प. शाळाची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही.


.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments