‘बिग बॉस-१५’मध्ये अंकिता लोखंडे सहभागी होणार
‘बिग बॉस-१५’मध्ये अंकिता लोखंडे सहभागी होणार
पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने फक्त टीव्ही जगतातच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. अंकिता लोखंडेचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेला ‘बिग बॉस’च्या १५व्या (reality show) पर्वासाठी विचारणा करण्यात आल्याच्या चर्चा रंगत आहेत.सोशल मीडियावरून (social media) अंकिता कायम आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अंकिता लोखंडे ‘बिग बॉस-१५’मध्ये झळकणार अशा चर्चा सुरु असतानाच स्वत: अंकिता लोखंडेने यावर प्रतिक्रिया दिलीय.अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ती ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.या पोस्टमध्ये ती म्हणाली, “अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये अशा बातम्या येऊ लागल्या आहेत की मी यावर्षी ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी होणार आहे. मला वाटतं मीडिया आणि सर्वांनी हे नोट करावं की मी बिग बॉस या शोमध्ये सामील होणार नाही. या शोमध्ये मी सहभाग घेणार असल्याचं वृत्त खोटं आहे.मी अशा कोणत्याच गोष्टीचा भाग होणार नसतानाही लोकांनी लगेचच घाई करत मला व्देषपूर्ण प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय.” असं अंकिता तिच्या पोस्टमध्ये म्हणालीय.गेल्या वर्ष भरापासून ‘बिग बॉस १५’मध्ये (reality show) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यामुळे सोशल मीडियावरून अनेक नेटकऱ्यांनी अंकितावर निशाणा देखील साधला होता.अंकिता केवळ प्रसिद्धीसाठी आता ‘बिग बॉस’मध्ये सामील होवून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या मुद्दयावर लोकांचा सपोर्ट मिळवणार अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत्या. मात्र आता अंकिता लोखंडेने तिची प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिलाय.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment