रत्नागिरीतील ‘डेल्टा प्लस’ या कोरोनाच्या रुग्णांबद्दल जिल्हाधिकारी आज देणार माहिती




 रत्नागिरीतील ‘डेल्टा प्लस’ या कोरोनाच्या रुग्णांबद्दल जिल्हाधिकारी आज  देणार माहिती 


रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये डेल्टा प्लस या कोरोनाच्या व्हेरिएंट अर्थात नव्या रूपाची लागण झाल्याची आणि या संसर्गाच्या महाराष्ट्रातील 7 रुग्णापैकी 5 रुग्ण संगमेश्वर मधील असल्याची माहिती विविध माध्यमातून पुढे येत असताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबतआज  पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले आहे एकीकडे कोरोनाचे रुग्ण जिल्हयात सतत वाढत असले तेही यंदा सरसकट कंटेन्मेंट झोन प्रशासनाकडून तयार करण्यात येत नव्हते. मात्र गेल्या आठवड्यात संगमेश्वर तालुक्यातील 7 गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी अचानक घोषित केले आणि जिल्ह्याच्या भुवया उंचावल्या होत्या तर संगमेश्वर मधील त्या गावातील स्थानिकांनी या झोन बद्दल विरोध दर्शविला होता. ज्या वेळी झोन लागू करण्यात आले त्यावेळी अनेक गावातील कोरोना नियंत्रणात आल्याने या जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाने असंतोष व्यक्त केला जात होता. मात्र या गावांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट अर्थात प्रकार सापडल्याची शक्यता असल्याने हे झोन करण्यात आले असून त्याचे संशोधन सुरू आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र त्या महितीतही स्पष्टता नव्हती.दरम्यान रविवारी राज्यात नवा डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडलं असून ज्या 7 रुग्णांमध्ये हा कोरोनाचा नवा प्रकार सापडला त्या राज्यातील 7 पैकी 5 रुग्ण रत्नागिरीतील असल्याची माहिती पुढे आली आणि खळबळ उडाली. तर हे रुग्ण एप्रिल महिन्यात आढळले होते ही चर्चा देखील सुरू होती. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठवड्यापासून एकही अधिकृत माहिती पुढे येत नसल्याने संभ्रम वाढत होता.या संभ्रमबाबत जिल्हाधिकारी मिश्रा आज  पत्रकार परिषद घेणार असून त्यानंतरच या डेल्टा प्लस व्हेरिएंट बद्दल स्पष्टता येणार आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments