रत्नागिरीतील भाट्ये येथे ॲसिड वाहतूक करणारा टँकर दरीत कोसळला




 रत्नागिरीतील भाट्ये येथे ॲसिड वाहतूक करणारा टँकर दरीत कोसळला


रत्नागिरीतील भाट्ये गावात फिनॉलेक्स कंपनीतून एच.सी.एल.ॲसिड घेऊन जाणारा टँकर अवघड वळणावर दरीत कोसळून अपघात झाला आहे. हा टँकर फिनॉलेक्स कंपनीतून लोटे येथे जात होता. झरी विनायक पुढील अवघड वळणावर ताबा सुटून हा टँकर दरीत गेला. सुदैवाने या अपघातात चालक वाचला आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या ट्रक मध्ये असणारे ॲसिड प्रथम काढून हा टँकर रिकामा झाल्यावर बाहेर काढण्यात येणार आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत हा टँकर जसाच्या तसा पडून होता. टँकर रस्त्यावर आणून ठेवण्यात आलेला नव्हता. गुरुवारी फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी घटनास्थळी होते. तसेच अग्निशमन दलाची गाडी देखील उपस्थीत होती.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या