गणेशखिंड येथे गुरांची बेकायदा वाहतूक करणारी टोळी पकडली; २१ जनावरांसह टेम्पो जप्त
गणेशखिंड येथे गुरांची बेकायदा वाहतूक करणारी टोळी पकडली; २१ जनावरांसह टेम्पो जप्त
चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावरील गणेशखिंड चेकपोस्ट येथे गुरांची बेकायदा वाहतूक करणारी टोळी पोलिसांनी पकडली आहे. यामध्ये ६ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून एकूण २१ जनावरे सापडली आहेत. ही घटना दि. २२रोजी मध्यरात्री ३.३० च्या दरम्यान घडली. या बाबत महेंद्र केतकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चन्नाप्पा पांडुरंग कोकरे (४५, रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली), इस्माईल हाजी जातकार (२५, रा. कुडची-बेळगाव), मोहम्मद दादन शेख (२६, रा. बेळगाव), अल्ताफ पापुलशेख (२३, रा. बेळगाव), रमजान कादीर शेख (२०, बेळगाव), सलीमलाल साहब जातकार (बेळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा जणांनी टेम्पोतून २१ गुरे टेम्पोच्या हौद्यामध्ये भरून बेकायदा कत्तलीसाठी नेत असताना आढळून आले. चिपळूण ते उगार (जि. बेळगाव) अशी गुरांची वाहतूक ते करणार होते. गणेशखिंड येथे त्यांना पोलिसांनी रोखले. यानंतर ही तस्करी उघड झाली. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा