जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान
रत्नागिरी:-जिल्ह्यात 24 तासात सरासरी 34.09 मिमी तर एकूण 306.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 21.30 मिमी , दापोली 28.80 मिमी, खेड 17.20 मिमी, गुहागर 82.80 मिमी, चिपळूण 30.30 मिमी, संगमेश्वर 34.10 मिमी, रत्नागिरी 36.30 मिमी, राजापूर 25.90 मिमी,लांजा 30.10 मिमी.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 15 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.खेड तालुक्यात मौजे खोपी येथे महेश वसंत निकम हे 10 जुन 2021 रोजी घरातून बेपत्ता होत, सदर व्यक्तीचा मृतदेह 13 जुन 2021 रोजी चक्रवती नदी जवळ सापडले.रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे महेंद्र प्रभाकर खामकर व इतर 4 जण यांच्या शेतात पाऊसाचे पाणी शिरुन शेताचे (नारळ व आंबे व पेरणी केलेले भात क्षेत्र) व बांधा फुटुन अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद, सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीत हानी नाही. करतुडे येथील चंद्रकांत अरविंद लिगांयत यांच्या ताब्यातील गाडी नं.एमएच ०३ बीएच ३३४० ही टेंभे पुल येथे चालवित असताना पाण्याच्या प्रवाहात वाहू गेली. त्यांनी गाडीतून उडी घेवून बाहेर पडले. कोणतीही जिवीत हानी नाही. उक्षी येथे दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद, सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीत हानी नाही.राजापूर तालुक्यात मोजे धोपेश्वर येथील गणपती मंदीराची पाऊसामुळे संरक्षक भिंत कोसळली. कोणतीही जिवीत हानी नाही. गोवह-बुरंवेवाडी या रस्त्यावर पन्हाळेतर्फे राजापूर येथे मोरी पाऊसामुळे खचली.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment