मालगुंड लसीकरण केंद्रावर राजकीय हस्तक्षेप ?




 मालगुंड लसीकरण केंद्रावर राजकीय हस्तक्षेप ?


 मालगुंड :-सध्या सर्वत्र लसीकरण जोरात चालू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु झाल्याने ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मालगुंड PHC येथेही लसीकरण सुरु आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होतो आहे. सकाळी 7 वाजल्यापासून लोकं रांगेत उभे राहतात आणि मग हे राजकीय मौनी बाबा 'राजू'रोसपणे तेथे घुसतात. आपले वैयक्तिक लोकं घुसवतात. कधी आपल्या लोकांची आधार कार्ड घेऊन येतात. नेवरे, कळझोंडी सारख्या गावांतून रिक्षा करुन येणाऱ्या वयोवृद्ध लोकांना चार चार तास थांबून हात हलवत परत जायची वेळ येते. हीच परिस्थिती स्थानिक लोकांना पण अनुभवावी लागते. कोणी आवाज उठवला तर दादागिरी केली जाते. यावर तोडगा म्हणून मग कूपन सिस्टीम सुरु झाली. पण नंतर हेच नेते कूपनची पिशवी घेऊन फिरु लागले. हे देतील त्यांना कूपन. यामुळे वारंवार वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. यांच्यापुढे आरोग्य केंद्रातील कर्मचारी पण हतबल आहेत. यात तालुका/जिल्हा आरोग्य विभाग लक्ष घालणार का? अशी चर्चा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांना मध्ये सुरू आहे तरी या मध्ये प्रशासन लक्ष घालणार का?



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments