फुलांनी भरलेल्या बागेत मौनी रॉयच फोटोशूट

 



फुलांनी भरलेल्या बागेत मौनी रॉयच फोटोशूट 



मौनी रॉय आता बॉलिवूड आणि टीव्हीच्या जगातील एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. सोशल मीडियावर   तिची जोरदार फॅन फॉलोइंग आहे. तिनं करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली आणि आता ती चित्रपटांमध्येही दिसली आहे.सोशल मीडियावरही तिनं ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. साडी असो किंवा बिकिनी, मौनी रॉयची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना खूप आवडते आणि चाहते तिचे कौतुकही करतात.नुकतंच मौनी रॉयनं तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. अभिनेत्री फुलांनी भरलेल्या बागेत पोज देताना दिसत आहे. रंगीबेरंगी फुलांमध्ये मौनीचा सुंदर लुक चाहत्यांच्या खूप  पसंतीस उतरला आहे.मौनी रॉय फिटनेस फ्रीक असून नुकतंच ती योग दिनाला योग करताना दिसली होती. योगा करत असताना तिनं आपलं फोटो शेअर केले आणि योगाने तिची मानसिकता कशी बदलली आणि तिच्यात सकारात्मकता कशी आणली हे कॅप्शनमध्ये सांगितलं होतंयापूर्वी, कोरोना काळात, तिनं लोकांना इस्कॉन संस्थेत सामील होण्यासाठी आणि कोरोना रुग्णांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. स्वत: मौनी रॉय देखील यावेळी गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आली होती.वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मौनी रॉय अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या