चिमुकल्याला बेदम मारहाण; मन हेलावले, आईविरुद्ध गुन्हा
चिमुकल्याला बेदम मारहाण; मन हेलावले, आईविरुद्ध गुन्हा
नागपूर:-सासूसोबत झालेल्या वादामुळे संतप्त झालेल्या आईने आपल्याच सहा महिन्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हिडीओची दखल घेत अंबाझरी पोलिसांनी लगेच कारवाई करीत मुलाची सुटका केली. आईविरुद्ध मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, महिला अंबाझरी परिसरात पती, सासू व अन्य नातेवाइकांसह राहते. दोन वर्षांपूर्वी तिचे ढोलवादक असलेल्या युवकासोबत लग्न झाले. तिला सहा महिन्यांचा मुलगा आहे. दीड वर्षांपासून तिचा पती बेरोजगार आहे. सासू मोलकरीण असून तिच कुटुंबाचे पालनपोषण करते. २४ मे रोजी तिचा पती व सासूसोबत वाद झाला. त्यामुळे संतापून तिने मुलाला अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ कोणीतरी तयार केला. तो व्हायरल झाला. चिमुकल्याला बेदम मारहाण होताना बघून समाजमन हेलावले.विवारी हा व्हिडीओ पोलिस उपायुक्त विनीता शाहू यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना व्हिडीओची सतत्या पडताळण्याचे निर्देश दिले. हिवरे यांनी शाहनिशा केली. व्हिडीओ अंबाझरीतील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस तेथे पोहोचले. मुलाची सुटका केली.त्यानंतर बाल संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सोमवारी सकाळी अधिकारी अंबाझरी पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आईचे समुपदेशन केले. त्यानंतर मुलाला नातेवाइकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आईविरुद्ध मारहाण व बाल हक्क संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment