बाप:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास





 बाप 


बाबाआई दोन बाजू

बाळासाठी असतात,

एक दिसत असते

एक नाहीच दिसत.


हेच पडद्यामागचे

सूत्रधार ज्ञानकर्ता,

जीवनाचा अविभाज्य

हाच तो पालनकर्ता.


रोज राबतो जीवनी

नित्य हसतो खेळतो,

नाही दाखवत दुःख

मनोमनी तो झुरतो.


बाळ जन्मले पासून

हर्ष मनात दाखवी,

करी पूर्ण हट्ट सदा

हास्य अविरत ठेवी.


घाव टाकीचे सोसले

नाही सावली घेतली,

करी नमन चरणी

ज्ञान गंगा ती पावली.


ऋण कोणत्याच जन्मी

नाही फेडूच शकत,

अशी किर्ती माया प्रेम

हाच प्रिय बाप देत.


अॅड. लक्ष्मण नारायण बेडेकर
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org