गुलाब:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास



गुलाब



लाल पिवळा तांबडा

शुभ्र गुलाबी केशरी

रंगामधे विविधता 

आहे याच्या कितीतरी


गोल नाजूक पाकळ्या

माऊ मखमली छान

राजा फुलांचा म्हणून

आहे सर्वत्र सन्मान


मना मोहवीते रूप

राजबिंडे तालेवार 

धुंद करणारा गंध

स्पर्श मृदु आलवार


प्रेमी युगलाचे प्रेम

याच्या साक्षीने साकार

वधु वराच्या गळ्यात

शोभे गळ्यातला हार


विजेत्यांच्या,पाहुण्यांच्या

सत्कारास, स्वागतास 

सर्व देवांचा लाडका

देव्हाऱ्यात शोभे खास


रंगा गंधाने समृद्ध

परी  काट्यात फुलतो

एक अनोखा संदेश

साऱ्या जगास हा देतो


रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड पुणे
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 




२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments