रस्त्यावर मोबाईल कव्हर विकणाऱ्या फेरीवाल्यांना व्यापारी महासंघाने हाकलले




रस्त्यावर मोबाईल कव्हर विकणाऱ्या फेरीवाल्यांना व्यापारी महासंघाने हाकलले


रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून सरकारच्या नियमावलीमुळे मोबाईल दुकाने बंद आहेत. पूर्वीपासून असणारे ऑनलाईन कंपन्यांचे आक्रमण आणि त्यात लॉकडाऊन यामुळे मोबाईल विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. दुकानांची भाडी, बँकांची कर्ज, नोकरांचे पगार कसे भागवायचे हा मोठा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर आहे. सध्या हि दुकाने बंद असताना मात्र परराज्यातून आलेले फेरीवाले मात्र बिनधास्तपणे मोबाईल कव्हर व इतर एक्सेसरी विकताना दिसत आहे. रत्नागिरी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांच्या कानावर हि गोष्ट पडताच त्यांनी जुना माळ नाका येथे धाव घेतली. सोबत महासंघाचे सदस्य सुनील धनावडे, अमोल डोंगरे यांना सोबत घेत या फेरीवाल्यांना पिटाळून लावले. पुन्हा रत्नागिरीत दिसल्यास व्यवस्थित समजावण्यात येईल असे देखील सांगण्यात आले. 



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments