अजित पवारांच्या कार्यक्रामात झालेली गर्दी पडली महागात…




 अजित पवारांच्या कार्यक्रामात झालेली गर्दी पडली महागात…



पुणे:-करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे महापालिका आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नीलेश निकम, बाळासाहेब बोडके, प्रदीप देशमुख, रोहन पायगुडे, महेश हांडे यांच्यासह १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, या प्रकारावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस कर्मचारी दिनेश वीर यांनी तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना २०२० या कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. डेंगळे पुलावर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी गाड्या लावल्या होत्या. त्यामुळे या भागातील वाहतूकही विस्कळित झाली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या कार्यक्रमासाठी परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. हांडे यांनी या अर्जात करोना संसर्ग असल्याने प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन केले जाईल, तसेच या कार्यक्रमास १०० ते १५० जण उपस्थित राहतील, असे अर्जात म्हटले होते.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments