१० वर्षांच्या मुलीवर सात जणांचा सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये १०-१२ वर्षांच्या मुलांचाही समावेश




 १० वर्षांच्या मुलीवर सात जणांचा सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये १०-१२ वर्षांच्या मुलांचाही समावेश



रेवाडी, हरयाणा : हरयाणाच्या रेवाडीमध्ये देशाला हादरवून टाकणारी घटना घडल्याचं समोर येतंय. अवघ्या १० वर्षांच्या मुलींकडून तब्बल सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलंय. उल्लेखनीय म्हणजे, या सात आरोपींमध्ये केवळ एक आरोपी सज्ञान (१८ वर्षांचा) असून इतर सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये १० आणि १२ वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. इतकंच नाही तर या आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओही काढला होता.२४ मे रोजी काही मुलं खेळता खेळता जवळच असलेल्या एका शाळेच्या इमारतीत गेले. करोना संसर्गकाळात शाळा सुरु नसल्यानं ही इमारत रिकामी होती. इथं सात मुलांनी एका १० वर्षांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले. परंतु, ही घटना तब्बल आठवड्याभरानंतर उघडकीस आलीय. सामूहिक बलात्काराच्या घटनेचा आरोपींनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आलीय.पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या निदर्शनास हा व्हिडिओ आला होता. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबानं ९ जून रोजी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली.रेवाडीचे पोलीस उपअधीक्षक (हेडक्वॉर्टर) हंसराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम २७६ डी, २५४ सी, ५०६, पॉक्सो, आयटी अॅक्ट आणि एससी/एसटी अॅक्ट अंतर्गत या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील अत्यंत गांभीर्याची बाब म्हणजे, आरोपींमध्ये केवळ एक आरोपी सज्ञान आहे. या आरोपीचं वय १८ वर्ष आहे. तर इतर सर्व आरोपींची वय १० - १२ वर्ष आहे. पीडित मुलीच्या शेजाऱ्यानं व्हिडिओच्या आधारे आरोपींना ओळखलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

आरोपी पीडित मुलीच्या नात्यातील

हे प्रकरण समोर येताच आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच भागात राहतात. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत सामूहिक बलात्काराची पुष्टी करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे, सात आरोपींपैंकी तीन जण मुलीच्या नात्यातील आहेत.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर पीडित मुलीसहीत आरोपी मुलंही धक्क्यात होती. यातल्या कुणीही आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला नाही. आरोपीही काहीही झालं नसल्याचं दाखवत आपापली कामं करत - खेळत होते. 

आरोपींवर कारवाई

सहा अल्पवयीन आरोपींना ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात धाडण्यात आलंय. तर १८ वर्षीय आरोपीला कोर्टासमोर हजर केल्यानंतर जिल्हा तुरुंगात धाडण्यात आलंय.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025



Comments