विभूती देऊळ:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास




विभूती देऊळ 


सरसर शिणव्यांनी

घन ओथंबून आले 

मेघ गडगडाटात

पक्षी सगळे उडाले 


दाट हिरव्या वृक्षांस

गोड यौवन खुलले 

गार हवेच्या झोतात 

खुशाल डोलू लागले 


हिरवी हिरवी पालवी 

काया मातीत थिजली

सनातनी भुगर्भाच्या 

बाहुपाशात निजली 


मृग कस्तुरी शिखरी 

केश धुरांचे थबकले 

गुंजारव करीत येणारे 

मिश्किल वादळ शमले 


मान्सून गोषवाऱ्यात

सळसळली पर्णपेठे

खाली हलकी पतन

इवली कोवळी देठे 


एकाएकी उत्साहात

मनास पडली भुरळ 

अचंब निःशब्द स्थिती

बांधले विभूती देऊळ 


वैकल्पिक योजनेंतर्गत

भागली आमची तृष्णा 

सदैव कृपादृष्टी आम्हावर

अशीच राहू दे रे कृष्णा 


- नयन धारणकर
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 




२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments