इंधन दरवाढीचा दणका ; या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा दर शंभरीपार



 इंधन दरवाढीचा दणका ; या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा दर शंभरीपार


मुंबई : इंधन दरवाढीच्या सपाट्याने राजस्थानमधील श्री गंगानगर या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव १०० रुपयांवर गेला आहे. दोन्ही इंधनाचा भाव १०० रुपयांवर गेलेलं श्री गंगानगर हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. दम्यान, शुक्रवार आणि शनिवार असे सलग दोन दिवस इंधन दरवाढ केल्यानंतर कंपन्यांनी आज रविवारी इंधन दर स्थिर ठेवले.शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोल २९ पैसे आणि डिझेलमध्ये २८ पैशांची वाढ केली होती. शनिवारी कंपन्यांनी पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २३ पैशांनी वाढवले होते. आज रविवारी कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही.आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०२.३० रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.१२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९७.४३ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९६.०६ रुपये आहे. आज मुंबईत डिझेलचा भाव ९४.३९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.९८ रुपये आहे. चेन्नईत ९१.६४ रुपये आणि कोलकात्यात ८९.८३ रुपये डिझेलचा भाव आहे राजस्थानातील श्री गंगानगर येथे देशातील सर्वात महागडे डिझेल मिळत आहे. येथे डिझेलचा भाव ९९.८० रुपये आहे.जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव ०.३८ डॉलरने वधारला आणि तो ७२.६९ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.८३ डॉलरच्या तेजीसह ७०.९१ डॉलर प्रती बॅरल झाला.शनिवारच्या दरवाढीनंतर कर्नाटकात पेट्रोलने शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कर्नाटकातील बिदर, बेल्लारी, कप्पल, दावणगिरी, शिमोगा आणि चिकमंगळूर या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. बंगळुरात पेट्रोल ९९.३९ रुपये आणि डिझेल ९२.२७ रुपये आहे.दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचा १०० रुपयांवर गेलेलं श्री गंगानगर हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. श्री गंगानगरमध्ये आजचा पेट्रोलचा भाव १०७.२२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव १००.०५ रुपये आहे. या ठिकाणी प्रीमियम पेट्रोलचा भाव ११०.५० रुपये आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


टिप्पण्या

news.mangocity.org