संसारे कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर समोरील खड्डा बनत आहे अपघातास निमंत्रण
संसारे कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर समोरील खड्डा बनत आहे अपघातास निमंत्रण
रत्नागिरी:-शहरातील नळपाणी योजनेसाठी केलेल्या रस्ते खोदाईमुळे शहरवासीय नाहक त्रासाला सामोरे जात आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे न बुजवल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून संसारे कॉम्प्लेक्स समोरील खड्ड्यामुळे शहरवासियांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रत्नागिरी शहरातील नळपाणी योजना गेल्या तीन ते चार वर्षापासून राबवली जात आहे. तरीही ती अपूर्ण आहे. ही पाणी योजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते पण तसे झालेले दिसत नाही. संपूर्ण शहरांमध्ये अनेक ठिकाणी रस्ता खोदलेला दिसतो. काही ठिकाणे मालगाड्या, रिक्षा लहान-मोठी वाहने अडकून पडत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रत्नागिरी शहरात चिखलाचे साम्राज्य झालेले दिसते. रस्ते चिखलमय झाले आहेत. दोन दिवसापूर्वी बाजारपेठेजवळ भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी भरल्याचे दिसून येत होते. रस्ता खोदाईमुळे, ड्रेनेज साफसफाई नसल्याने अतिवृष्टी काळात घरांमध्ये पाणी शिरण्याची भिती निर्माण झाली आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर मारुती मंदिरजवळ असलेल्या संसारे कॉम्प्लेक्स समोर पाण्याचा वॉल बसवण्यासाठी मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडचणी होत आहे. जर त्या खड्ड्यामुळे एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित होत आहे. खरोखरच या भागातील काम पूर्ण झाले असेल जर मुख्य रस्त्यावरील तो खड्डा बंद का केला गेला नाही की तो ठेकेदार, नगर परिषद एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का अशी चर्चा शहरवासियात आहे.
.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment