धक्कादायक, ट्रेनमध्ये नर्सचा केला विनयभंग
धक्कादायक, ट्रेनमध्ये नर्सचा केला विनयभंग
कोरोना विषाणूचा संसर्ग उद्भवल्यापासून देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस रात्र रुग्णांची सेवा करावी लागत आहे. महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासही उशीर होतं आहे. अशात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्युटी संपल्यानंतर ट्रेननं घरत परतणाऱ्या BMC च्या नर्सचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.आरोपीनं धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत शिताफीनं आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.पीडित नर्स रात्री आपलं काम संपवून डहाणू येथील आपल्या घरी निघाली होती. दरम्यान तिने रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी विरारहून सुटणारी शेवटची ट्रेन पकडली होती.प्रवास सुरू असताना वाणगाव रेल्वे स्थानकावरून आरोपी तरुण महिला डब्यात शिरला. त्यानं नर्सच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नर्सनं प्रसंगावधान दाखवत आरोपीशी प्रतिकार करत मोबाईल परत मिळवला.यानंतर आरोपी तरुणानं धावत्या ट्रेनमध्ये नर्सचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. डहाणू स्टेशन येताच पीडित नर्सनं आरडाओरडा केला. तोपर्यंत आरोपी तरुणानं पोबारा केला होता.रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पीडितेनं रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला पकडलं आहे.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment