संगमेश्‍वर तालुक्यात सापडलेला व्हेंरिअंट डेल्टा प्लसचा: जिल्हाधिकारी


 


संगमेश्‍वर तालुक्यात सापडलेला व्हेंरिअंट डेल्टा प्लसचा: जिल्हाधिकारी 


रत्नागिरी:- संगमेश्‍वर तालुक्यातील त्या पाच गावांमध्ये सापडलेला व्हेंरिअंट हा डेल्टा प्लस असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले; मात्र तेथील परिस्थिती नियंत्रणा असून व्यापार्‍यांच्या निर्बंधासंदर्भात चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यावरच कार्यवाही करु असेही त्यांनी यावेळी बजावले.दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात डेल्टा प्लस नाही असे जाहीर केले होते. शासनाकडून आलेल्या पत्रानुसार तो व्हेरिअंट ऑफ कन्सर्स आणि व्हेरिअंट ऑफ इनव्हेस्टीगेशन असल्याचे नमुद केले होते. आजही तिच परिस्थिती आहे. मात्र शासनाने जिल्ह्यातील 9 रुग्ण डेल्टा प्लस असल्याचे जाहीर केले. आपल्याकडे अधिकृत पत्र आलेले नाही. ते आल्यानंतर माहिती दिली जाईल. संगमेश्‍वर तालुक्यातील पाच गावांमधील त्या लोकांमध्ये हा व्हेरिअंट सापडला आहे. तेथील लोकांचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिल्लीत पाठवले होते. त्यानंतर व्हीडीओ कॉन्फरन्स झाली होती. त्यांनी सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार उपाययोजना त्या पाच गावात राबविण्यास सुरवात केली आहे. तो भाग कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तेथील सर्व लोकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 6 हजार 106 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या असून 141 बाधित सापडले. त्यातील बहूतांश लोकांना कमी लक्षणे आहेत. बाधितांना विलगीकीकरणात ठेवून उपचार सुरु आहेत. बाधित सापडलेल्या लोकांच्या लसीकरणाची माहिती, त्यांना केव्हापासून लक्षणे दिसू लागली. ते कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाले याची माहिती एकत्रित करुन आयडीएसपी सेलला पाठवण्यात येत आहे. आयडीएसपीचे एक विशेष पथक मंगळवारी (ता. 22) दाखल झाले होते. त्यांच्याकडे 117 लोकांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे संशोधन झाल्यानंतर स्ट्रेनचा प्रकार कोणता, तो किती संसर्गजन्य आहे, सध्या कितीजणांमध्ये पसरला आहे हे सविस्तर समजणार आहे.कोरोना चाचण्यांबरोबरच सारी आणि आयएलआयची तपासणी प्रतिबंधीत गावांमध्ये केली जात आहे. पाच गावांमध्ये आणखी गावे समाविष्ट झाली असून त्यांचे आदेश काढले जात आहेत.कोरोनाचा विषय संवेदनशील आहे. महाराष्ट्रात जळगाव, रत्नागिरी येथे डेल्टा प्लस असल्याचेप्रेसनोटमध्ये नमुन केले होते. मध्यप्रदेश, केरळमध्येही डेल्टा प्लस सापडला आहे. ही माहिती अधिकृत मिळाली आहे; मात्र तो किती संसर्गजन्य आहे याचे संशोधन सुरु आहे. रत्नागिरीत व्हेरिअंट आहे, हे निश्‍चित होते; मात्र तो डेल्टाप्लस आहे कींवा नाही हे शासनाकडून जाहीर केले जाते. त्याचे अधिकार जिल्हास्तरावर नाहीत, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments