अंदाजपत्रक शंकास्पद! साहित्य संमेलनाबाबत ठाले पाटलांचा जातेगावकरांचा आरोप
नाशिक येथे नियोजित ९४ वे साहित्य संमेलन कमी खर्चात करावे, असे बैठकीत ठरले असताना, लोकहितवादी मंडळाच्या अध्यक्षांनी त्यात वेळोवेळी बदल केले. ते शंकास्पद असल्याने स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
नाशिक येथे नियोजित ९४ वे साहित्य संमेलन कमी खर्चात करावे, असे बैठकीत ठरले असताना, लोकहितवादी मंडळाच्या अध्यक्षांनी त्यात वेळोवेळी बदल केले. ते शंकास्पद असल्याने स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मंडळाच्या अध्यक्षांनी हाणून पाडला. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी येणारी रक्कम पाहून वेळोवेळी अंदाजपत्रकात बदल केल्याने त्यांची भूमिका शंकास्पद वाटत असल्याचा आरोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ठाले पाटील म्हणाले की, नाशिकला होणारे साहित्य संमेलन लोकहितवादी मंडळाचे न राहता ते तमाम नाशिककरांचे व्हावे, असा आमचा कटाक्ष होता. मात्र, तो सफल झाला नाही. स्वागत समितीमध्ये पाचशे सभासदांची निवड केली असती तर २५ लाख रुपये निधी उभा राहिला असता. त्याचप्रमाणे शहरातील दानशूरांकडून व सरकारी मदतीतून संमेलन होऊ शकले असते. १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरातून पाचशे सभासद होणे अवघड नाही. जातेगावकरांनी ३५ पेक्षा जास्त सभासद केले नाहीत. याबाबत त्यांना वारंवार सूचना करुनही त्यांनी सभासद वाढवले नाहीत. संमेलनाचा भार सगळ्यांमध्ये वाटला जावा ही आमची भूमिका होती. दीड महिना मागे लागूनही त्यात फरक पडला नाही. जातेगावकरांनी सगळा भार पालकमंत्री भुजबळ यांच्यावर टाकला. भुजबळांनी आमदारांकडून निधीची मागणी केली. आमदारांनीही त्याला प्रतिसाद दिला. जमा होणाऱ्या रकमेचा आकडा फुगत चालल्याने इकडे अंदाजपत्रकही वेळोवेळी बदलत गेले. संमेलनाचे अंदाजपत्रक आजपर्यंत त्यांनी जनतेसाठी कधीही खुले केले नाही. काही पत्रकारांनी त्यांच्याकडे अंदाजपत्रकाची मागणी केली, परंतु ते त्यांना देण्यात आले नाही. जातेगावकरांनी एककल्ली कारभार करण्याचा प्रयत्न केला. आजवर एकदा जाहीर झालेले अंदाजपत्रक वारंवार कधीही बदलत गेले नाही. कामे देण्याची पद्धत एकहाती सोपवल्याने हा सगळा प्रकार घडत होता. याचे विक्रेंद्रीकरण झाले असते तर अशा शंका साहित्य वर्तुळात निर्माण झाल्या नसत्या. हे साहित्य संमेलन नाशिककरांचे न होता ते सरकारचे झाले असते, असे ते म्हणाले....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment