कोरोना काळांमध्ये मानसिक आरोग्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे काळाची गरज... डॉ. संदीप महामुनी




कोरोना काळांमध्ये मानसिक आरोग्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे काळाची गरज... डॉ. संदीप महामुनी 


 रत्नागिरी:- रत्नागिरी क्लब आणि परिचारिका वेल्फेअर मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने "कोरोना काळातील मानसिक आरोग्य" या विषयावर प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप महामुनी ऑनलाइनच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे.परीचारिका वेल्फेअर मंच यांच्यातर्फे दर महिन्याला परिचारिका आणि सर्वसामान्य जनतेला समाज उपयोगी असे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. मे महिन्यातील  कार्यक्रम परिचारिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी श्री संदीप लोखंडे या मल्टी टॅलेंटेड कलाकाराने मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला. आणि जून महिन्यांमध्ये डॉ. संदीप महामुनी यांना आमंत्रित करण्यात आले होते.डॉक्.संदीप महामुनी हे पुण्यामध्ये अतिशय प्रख्यात असे मानसोपचारतज्ञ आहेत.येरवडा जेलमध्ये  मानसोपचारतज्ञ  म्हणून सतत कार्यक्रम होत असतात.आपल्या व्याख्यानांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रकार अतिशय सोप्या आणि सर्वसामान्य लोकांना समजतील असे समजून सांगितले.सर्वसाधारण निरीक्षणांमधून आपणसुद्धा आपल्या घरातील आणि मित्रमंडळींना मानसिक आजाराचा अंदाज येऊ शकतो असे प्रभावी व्याख्यान देण्यात आले.  नुकत्याच वयात येणाऱ्या परंतु दहावी आणि बारावी सारख्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या वर्षांमध्ये कोणते मानसिक बदल होतात तसेच कोरोनाकाळामध्ये ऑनलाइनची जोड असल्याने किशोरवयातील आणि तरुण वयातील मुलं भरकटणार नाहीत ना ? यासाठी पालकांनी आवर्जून डॉक्टरांना प्रश्न विचारले या प्रश्नाच्या उत्तरामध्ये डॉक्टरांनी असे समजवले की, विद्यार्थ्यांशी सतत संवाद ठेवून लैंगिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये योग्य आणि शास्त्रशुद्ध माहिती देणे ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे.कोरोनाकाळामध्ये परिचारिका या वर्गाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्या तणावाचे मुळ कारण सांगून समाज आणि परिचारिकांच्या घरातील व्यक्तीने कशा प्रकारे सहकार्य केले पाहिजे याबद्दल माहीती दिली. परिचारिकांचे मानसिक मनोधैर्य कसे वाढेल याबद्दल अतिशय शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये परिचारिका वेलफेअर मंचतर्फे श्रीमती पूर्वा महेश आंबेकर ,बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलच्या परिसेवीका यांनी डॉ.संदीप महामुनी यांची ओळख सांगितली आणि संपूर्ण कार्यक्रमाचे प्रश्नउत्तर भागाचे संयोजन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनांमध्ये रत्नागिरी क्लब सह आयोजक होता त्यांच्यातर्फे प्राध्यापक उदय बामणे एड. योगिता पावसकर- फणसेकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीमती स्नेहा बने,परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष तसेच डॉ. प्रभाकर द्राक्षे, माजी प्राचार्य घाडी कॉलेज गडहिंग्लज ,कोल्हापूर हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ.आनंद आंबेकर यांनी केले. परिचारिका वेल्फेअर मंचचे उद्देश सांगताना आवर्जून सांगितले की,हि परिचारिका संघटना नव्हे तर परिचारिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेली महाराष्ट्रभर चळवळ आहे तसेच रत्नागिरी क्लब हा एक बहुउद्देशीय संघटन करणारा समूह आहे की,यामध्ये अनेक संस्थांशी समन्वय साधून सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य आणि सांस्कृतिक संदर्भात काम करणार आहे असे आवर्जून डॉ. आनंद आंबेकर यांनी सांगितले .मानसिक आरोग्याची शास्त्रशुद्ध माहिती दिल्याबद्दल आभार श्री. प्रभाकर मुळेकर, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल यांनी मानले.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments