संकटांवर यशस्वी मात करत सुभाष गुरव जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू
संकटांवर यशस्वी मात करत सुभाष गुरव जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू
रत्नागिरी:-कोरोनामुळे 20 दिवस मृत्यूशी दिलेली झुंज. त्यातच वडीलांचे झालेले निधन. अशी एका पाठोपाठ एक आलेल्या संकटांना धीराने तोंड देत वडीलांच्या निधनाचे दुःख पचवत राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती आणि कोदवली विभागाचे विद्यमान सदस्य सुभाष गुरव आता पुन्हा एकदा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी रूजू झाले आहेत.एप्रिल महिन्यात सुभाष गुरव यांना कोरोनाची लागण झाली. त्यांचे संपूर्ण कुटूंबच कारोनाच्या विळख्यात सापडले. मात्र गुरव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका नामांकित खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोमामध्ये असल्याने तब्बल 19 दिवस ते आय.सी.यु.मध्ये मृत्यूशी झुंज देत होते. जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. ते रूग्णालयात असतानाच त्यांच्या वडीलांचे कोरोनाने निधन झाले. त्याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. ते पूर्ण बरे झाल्यानंतर ती घटना त्यांना सांगण्यात आली. त्यावेळी त्यांना प्रचंड धक्का बसला. सुभाष गुरव यांना कोरोनाची लागण झाल्याचे आणि ते अत्यवस्थ असल्याची बातमी त्यांच्या मतदार संघात समजताच त्यांचे मित्रपरिवार, हितचिंतक आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची प्रकृती सुधारावी याकरीता देवाकडे प्रार्थना केली. अनेकांनी आपल्या ग्रामदेवतांना नवस केले. त्यांच्या प्रार्थनेला यश येताना या जीवघेण्या आजारातून सुभाष गुरव सुखरूप बाहेर पडले. या आजारपणाच्या कालावधीत त्यांना कुटुंबाची आणि खास करून पुतण्यांची मोलाची साथ लाभली. एक पुतण्या कोरोना बाधित होऊन त्यांच्यासोबतच रूग्णालयात त्यांची सेवा करत होता. तर दुसरा पुतण्या सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहून तब्बेतीची माहिती घेत होता. आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत हे देवदुताप्रमाणे आपल्यासाठी धावून आल्याचे श्री.गुरव सांगतात. आमदार साळवी हे आपले दैवत असून त्यांनी तब्बल दोन वेळा कोल्हापूरला जावून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या तब्बेतीची विचारपूस केल्याचे गुरव यांनी सांगितले. देव-देवतांची कृपा आणि माझ्या मतदार संघातील जनतेचे आशिर्वाद यामुळे मी या आजारातून बरे झाल्याचे ते सांगतात. तसेच कोल्हापूर येथील पालकमंत्री, आमदार आणि नगरसेवक यांचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील जनतेला दिलेल्या शब्दापमाणे काही कामे अर्धवट आहेत तर काही कामे मंजूर करावून घ्यायची आहेत. आजारपणामुळे ते शक्य झाले नसले तरी आता या कामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. तब्बल दोन महिन्यानंतर आता पुन्हा सुभाष गुरव पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी रूजू झाले आहे.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Comments
Post a Comment