‘राज्य उत्पादन’ची आणखी एक धडाकेबाज कारवाई !
‘राज्य उत्पादन’ची आणखी एक धडाकेबाज कारवाई !
गुहागरात सापडला साडेसात लाख रुपयांचा विदेशी मद्याचा साठा; महिलेसह दोघांवर कारवाई
गुहागर:-गुहागर तालुक्यातील नरवण व बो-या येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून 7 लाख 47हजार 560 रू.किमतीचा गोवा बनावट विदेशी मदयाचा मुददेमाल जप्त केला .गुहागर तालुक्यातील नरवण येथे गोवा बनावट विदेशी मदयाचा साठा केला असल्याची माहीती प्र.अधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. या नुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामिण व भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी नरवण येथुन गोवा बनावट गोल्डन एस व्हास्कीच 25 बॉक्स, महाराष्ट्र बनावटीच्या मदयाचे 01 बॉक्स, 180 लि.गावठी दारू व 01 नंबरप्लेट नसलेली स्विफट डिझायर कार असा एकूण 682976 / – रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला. ही कारवाई 29/06/2021 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास करण्यात आली .याप्रकरणी नितेश दिनेश आरेकर (वय 32 वर्षे रा.नरवण ता.गुहागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नितेश दिनेश आरेकर याने गोवा बनावट मदयाचे काही बॉक्स घराचे बाजूस गोठयात तर गावठी दारू व काही बॉक्स स्विफट डिझायर कार मध्ये ठेवले होते. यानंतर बो-या ता.गुहागर येथे कारवाई करून गोल्डन एस व्हीस्कीचे 2 बॉक्स सह मॅक्डॉल नं 01 व्हिस्की , हायवर्डस व्हिस्की, डिएसपी ब्लॅक असा एकूण 64 हजार 584 रू.किमतीचा मुददेमाल जप्त केला . याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर (वय 42 वर्षे रा.कोंड कारूळ बो-या) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई निरीक्षक शरद जाधव, दुययम निरीक्षक सत्यवान भगत, किरण पाटील, स.दु.नि विजय हातीसकर, जवान सागर पवार, दत्तप्रसाद कालेलकर, विशाल विचारे, महिला जवान अनिता नागरगोजे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक शरद जाधव व दुययम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. याचपध्दतीने गोवा बनावट व गावठी दारूधंदयावर कारवाया सुरू राहतील असा इशारा प्र.अधिक्षक वैभव.व्ही.वैदय यांनी दिला आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment