हद्द झाली! जग लढतंय कोरोनाशी आणि चीनमध्ये सुरू आहे हा फेस्टिव्हल






 हद्द झाली! जग लढतंय कोरोनाशी आणि चीनमध्ये सुरू आहे हा फेस्टिव्हल


जगभरात कोरोना  संसर्गाला कारणीभूत ठरल्याने अनेक देश चीनवर  नाराज आहेत. अनेक देशांनी चीनवर बहिष्कार  टाकण्याचा निर्णय घेतला आहे.वुहान मार्केटमधून कोरोना विषाणूचासंसर्ग झाला असे चीनने म्हटलं असलं तरी हा विषाणू चीनमधील लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा अनेक देशांनी केला आहे. खरं काय, हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.चीनमधून काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या छायाचित्रांनुसार, चीनमध्ये वादग्रस्त डॉग मीट फेस्टिव्हलचे  आयोजन केल्याचे दिसत आहे. कोरोना काळात चीनने या फेस्टिव्हलचे आयोजन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.युलिनमध्ये  या फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून ते पुढील 10 दिवस ते सुरू राहणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये हजारो-लाखो लोक सहभागी होतात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हलसाठी कमी लोक येतील असा अंदाज आहे.या वादग्रस्त फेस्टिव्हललाअनेक प्राणीहक्क संघटनांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही दरवर्षी चीनमध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. या 10 दिवसीय फेस्टिव्हलमध्ये हजारो श्वानांना मारुन त्यांचे मांस सेवन केले जाते.वटवाघुळं सेवन करुन कोरोनाची सर्वप्रथम सुरुवात चीनने केली होती. त्यामुळे आता कोणकोणत्या जनावरांपासून आणखी कोणते विषाणू चीन जगाला देणार हा प्रश्न विचारला जात आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments