ग्रामसभेत ग्रामसेवकास मारहाण
सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथे पाणी टंचाईवर उपाययोजनांविषयी आयोजित ग्रामसभेत काही सदस्यांनी विरोध करीत सभा सुरु असतांना गोंधळ निर्माण के ला. ग्रामसेवक मनोहर वाघेरे यांना मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी..
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथे पाणी टंचाईवर उपाययोजनांविषयी आयोजित ग्रामसभेत काही सदस्यांनी विरोध करीत सभा सुरु असतांना गोंधळ निर्माण के ला. ग्रामसेवक मनोहर वाघेरे यांना मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुंटविहीर येथे ग्रामसभा सुरू असतांना ग्रामपंचायतीचे सदस्य कासम वळवी यांनी सभेतून उठून वाघेरे यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या डोक्यावर चापटी मारल्या. ग्रामसभेचे इतिवृत्त हिसकावून घेत सभेतून पळ काढला. शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शासकीय काम करण्यास मज्जाव केला. त्याचप्रमाणे शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने वळवीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेत सर्वच पाडय़ावरचे नागरिक उपस्थित होते. सरपंच यमुना पवार यांनी टंचाईच्या काळात काही पाडय़ांवर ग्रामसभेची मंजुरी न घेताच पेसा निधीतून कूपनलिका खोदून पाणी पुरवठा केला आहे. या खर्चास काही सदस्यांनी विरोध दर्शविला होता. या कामाची देयके देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस सरपंचांनी पूर्व परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त घेतला होता.
मारहाणप्रकरणी सरपंच यमुना पवार यांनी तक्रार दाखल केली. काही सदस्यांनी दमदाटी करीत आपण मनमानी करीत असल्याचा आरोप के ला. कुरापत काढत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रोरीत म्हटले आहे. टंचाईविषयक सभेत गोंधळ निर्माण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने ग्रामपंचायत सदस्य कासम वळवी, वसंत झिरवाळ, सुनील झिरवाळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी वसंत भोये, डी. टी. गावित, व्ही. एन. अहिरराव, व्ही. पी. पालवी, व्ही. डी. बागुल यांनी तीव्र निषेध केला आहे. तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष वसंत भोये यांनी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांसमोर अशा मारहाणीच्या घटना घडत असतील तर कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसते. मारहाण करणाऱ्या सदस्यास शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment