पहिली भेट:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
पहिली भेट
आज साठवे मनी,
या पावसासरी;
त्या रस्त्यावरी,
भेट "ती"ची....
कसे सांगु आज मी,
काय झाले त्या क्षणी;
अन् मन आठवी,
भेट "ती"ची.... ॥ध्रृँ॥
प्रथम पाहताना हे मन हरवे,
जगास विसरूनी "ती"च्यात रमते!
काय सांगु पुढे मी,
लोक जमता क्षणी;
वेडा म्हणे हा कुणी,
त्या रस्त्यावरी....
कसे सांगु आज मी,
काय झाले त्या क्षणी;
अन् मन आठवी,
भेट "ती"ची.... ॥१॥
लाजे हळुच "ती" गाली,
निघुनी जाता पाहुनी हसली!
होई वेडापिसा मी,
मग बेभान नाची;
आनंदी मनी,
त्या रस्त्यावरी....
कसे सांगु आज मी,
काय झाले त्या क्षणी;
अन् मन आठवी,
भेट "ती"ची.... ॥२॥
या पावसातही मन भरूनी येते,
अश्रु नयनी का मग हे साचते!
आता सांगु कुणा मी,
ही कहाणी;
एक राजा अन् राणी,
त्या रस्त्यावरी....
कसे सांगु आज मी,
काय झाले त्या क्षणी;
अन् मन आठवी,
भेट "ती"ची.... ॥३॥
आज साठवे मनी,
या पावसासरी;
त्या रस्त्यावरी,
भेट "ती"ची.... ॥ध्रृँ॥
रत्नागिरी
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment