लग्नाला परवानगी पण मंगळसूत्राला नाही...आता लग्न काय आम्ही फाटक्या कपड्यांवर लावायचे काय ?



लग्नाला परवानगी पण मंगळसूत्राला नाही...आता लग्न काय आम्ही फाटक्या कपड्यांवर लावायचे काय ?


 रत्नागिरी : नियमावलीच्या गोतावळ्यात शासनाने नागरिकांची गोची करून ठेवल्याचे दिसत आहे. दिनांक ८ जून रोजी लागू करण्यात आलेल्या नवीन नियमावलीनुसार २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र जे मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालून विवाह विधी पार पडतो त्या मंगळसूत्राची दुकाने मात्र नव्या नियमानुसार बंद ठेवण्यात आली आहेत. लग्न समारंभात मंगळसूत्रासोबत दागदागिने व नवीन कपडे यांची खरेदी देखील आवश्यक असते. मात्र सोनारांची आणि कपड्याची दुकाने बंद ठेवल्याने आता नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक व्यवसाय हे परस्पर पूरक आहे, याचा कोणताही विचार न करता हि नियमावली तयार करण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून होत आहे. आता लग्न काय आम्ही फाटक्या कपड्यांवर लावायचे काय? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. 


.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


टिप्पण्या

news.mangocity.org