अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल




 अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल


रत्नागिरी : कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाउन असतानाही अत्यावश्यक सेवेत नसलेली आपली दुकाने उघडून साहित्याची विक्री केली. याप्रकरणी दुकान मालकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 11 आणि 12 जून रोजी आरोग्यमंदिर, गोडबोले स्टॉप, राधाकृष्ण नाका, आठवडा बाजार, मारुती मंदिर या ठिकाणी करण्यात आली. हुकुमसिंग चव्हाण (32, रा.तेली आळी, रत्नागिरी), प्रदिप बीधर्माप्पा (28, रा.लक्ष्मीचौक, रत्नागिरी), धर्मराज रेडीज (44, रा.जोशीपाळंद, रत्नागिरी), मुस्ताक शेख (39, रा.शिरगाव, रत्नागिरी), अजित पवार (22, रा.घुडेवठार, रत्नागिरी), कन्हैयालाल माळी (45, रा.पऱ्याची आळी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असल्याचे माहित असतानाही दुकाने उघडून ग्राहकांना साहित्याची विक्री केली. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


टिप्पण्या

news.mangocity.org